वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी मध्ये अनेक नवनवीन समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहेच. इचलकरंजीत यंत्रमाग उद्योग भरपूर असल्याकारणाने अनेक लोक कामाच्या निमित्ताने इचलकरंजीत स्थायिक देखील झालेले आहेत. आता इचलकरंजीतील यंत्रमाग धारकांसमोर आणखी एक पेच निर्माण झालेला आहे. इचलकरंजीत सायझिंग असोसिएशनने सायझिंग दरात वाढ केलेली आहे.
मात्र त्याचवेळी यंत्रमाग धारकांवर काही नवीन नियम आणि अटी लादल्या आहेत. याबाबत सायझिंग असोसिएशनने यंत्रमागधारक संघटनांशी कोणताही पत्रव्यवहार किंवा संपर्क साधलेला नाही. त्यामुळे केलेली दर वाढ आणि नवीन नियम किंवा अटी यंत्रमागधारक तसेच ट्रेडिंग धारकांनी स्वीकारू नये असे आवाहन इचलकरंजी पॉवर लूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे इचलकरंजीत आणखीन एक पेच निर्माण झालेला आहे.