राहत्या घरात टोकाचं पाऊल, चिठ्ठीत भयंकर उलगडा

बांधकाम व्यावसायिक गुरु चिचकर यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक वृ्त्त समोर आलं आहे. चिचकर हे नवी मुंबईतील प्रख्यात बिल्डर आहेत. त्यांनी आपल्या राहत्या घरातच () डोक्यात गोळी झाडून टोकाचं पाऊल उचललं. गुरु हे भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज सिंडिकेटचे प्रमुख नवीन चिचकर यांचे वडील आहेत. मुलावर दाखल केसेसच्या प्रकरणात चौकशी अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून चिचकरांनी आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती आहे.

गुरु चिचकर हे नवी मुंबईतील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. शुक्रवारी पहाटे साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांनी स्वतःच्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. राहत्या घरातच (residential house) त्यांनी आयुष्याची अखेर केली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोटही सापडली आहे.

चिचकरांच्या मुलावर नार्कोटिक्स विभागाकडून अनेक केसेस दाखल आहेत. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं चिचकरांनी लिहिलं आहे. नवीन चिचकर सध्या देश सोडून पळून गेले आहेत. एनसीबीला त्यांचा अनेक गुन्ह्यांमध्ये शोध घेत आहे.