भारतातील सर्वात महागडा अभिनेता; मानधन ऐकून व्हाल थक्क

आज भारतात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सुपरस्टार्सची भर पडली आहे. शाहरुख खान, सलमान खान, रजनीकांत आणि अल्लू अर्जुनसारखे स्टार चित्रपटासाठी मोठी फी मागतात. सर्वांचं मानधन (remuneration) जवळपास १०० ते २०० कोटी रुपये आहे. पण आज आपण अशा विनोदी कलाकाराबद्दल सांगत आहोत, जे विनोद खन्ना, अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना सारख्या मोठ्या स्टार्सपेक्षा फक्त कॅमिओ भूमिकांसाठी जास्त फी घेत असत. जाणून घेऊया या अभिनेत्याबद्दल.

१९४० च्या दशकात ‘किस्मत’ चित्रपटात मेहमूद यांनी बाल कलाकार म्हणून काम केलं होतं. १९५० च्या दशकात त्यांनी ‘सीआयडी’ आणि ‘प्यासा’ सारख्या चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारून स्वतःची एक मजबूत ओळख निर्माण केली. त्यांना सुरुवातीपासूनच मुख्य भूमिका साकारण्याची इच्छा होती. १९६० च्या दशकात, मेहमूद यांनी केवळ भारतातील आघाडीचा विनोदी कलाकार म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं नाही तर एक यशस्वी स्टार देखील बनले. ‘पडोसन’, ‘भूत बांगला’, ‘जौहर महमूद इन हाँगकाँग’ आणि ‘बॉम्बे टू गोवा’ हे त्यांचे चित्रपट यशस्वी झाले.

मेहमूद यांनी ‘हमजोली’, ‘पडोसन’, ‘ससुराल’, ‘आंखे’, ‘दो फूल जिंदगी’, ‘गुमनाम’, ‘दिल तेरा दीवाना’, ‘प्यार किया जा’, ‘लव्ह इन टोकियो’, ‘भूत बांगला’, ‘वारिस’, ‘वारिस’ यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

मेहमूद जास्त मानधन घ्यायचे

६०च्या दशकाच्या अखेरीस, मेहमूद देशातील सर्वाधिक मानधन (remuneration) घेणारा अभिनेता बनले होते. द प्रिंटमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, त्यावेळी मेहमूद चित्रपटांमध्ये फक्त दोन आठवड्यांच्या कॅमिओसाठी ७.५ लाख रुपये घेत असत. त्या काळातील सुनील दत्त, धर्मेंद्र, शम्मी कपूर आणि राजेंद्र कुमार यांसारखे आघाडीचे कलाकार संपूर्ण चित्रपटासाठी ५ लाख रुपयांपेक्षा कमी मानधन घेत असत. ७० च्या दशकाच्या मध्यापर्यंत सुपरस्टार राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनाही ७.५ लाख रुपयांचा टप्पा ओलांडता आला नव्हता. असं म्हटलं जातं की ८० च्या दशकापर्यंत, मेहमूद त्यांच्या कॅमिओसाठी सलमान खान आणि आमिर खान त्यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांसाठी जितके पैसे घेऊ शकत नव्हते तितके पैसे घेत असत.