खरीप पणन 2024- 25 मध्ये ऑनलाइन शेतकरी नोंदणीचा कालावधी हा 31 डिसेंबर 2024 पर्यंत असणार आहे. आटपाडी तालुक्यातील त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये ऑनलाईन नोंदणी लवकरात लवकर करायची आहे. खरीप पणन हंगाम सन 2024- 25 मधील किमान आधारभूत किंमत खरेदी 1 योजनेअंतर्गत भरडधान्य (मका) करिता शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन मार्केट कमिटीचे सभापती संतोष पुजारी यांनी केले आहे.
या ऑनलाइन नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे सोबत घेऊन यावेत. यामध्ये चालू हंगाम सन 2024 – 25 सालचा पीक पेरा नोंद असलेला सातबारा उतारा व आठ अ उतारा आवश्यक आहे. चालू असलेले बँक पासबुक खात्याची झेरॉक्स व आधार कार्ड झेरॉक्स असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक तसेच त्या शेतकऱ्यांचा फोटो अपलोड करण्यासाठी स्वतः शेतकरी यांनी बाजार समितीमध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे.