हुपरीत तीन लाखाचा ऐवज लंपास! दोन ठिकाणी चोरी…

अरुण बडवे हे सोमवारी कुटुंबासह देवदर्शनाला बाहेर गावी गेले होते. ते पहाटेच्या सुमारास परत आले. कुलूप उघडून घरात प्रवेश करून सर्वजण झोपी गेले. सकाळी उठल्यावर तिजोरीतून काही वस्तू घेतांना चोरी झाल्याचे लक्षात आले. यावेळी शेजारी असलेल्या महालदार या पाहूण्यांच्या घरातही चोरट्यांनी हात साफ केले आहेत. यामध्ये दोन्ही ठिकाणी अंदाजे २ लाख ५६ हजार रुपये किंमतीचे १३० ग्रॅम सोन्याचे दागिने व २९ हजार ५०० रुपयांचे चांदीचे दागिने, २ हजार किंमतीचे घड्याळ, रोख रक्कम ८० हजार रुपये असा एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. संशयावरुन गावातील त्यांच्या कामगाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.