स्थानिक स्वराज्य संस्थेवर धनुष्यबाणाचा भगवा फडकवण्याचा शहाजीबापू पाटील यांचा निर्धार…

विधानसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील यांना पराभवाचा धक्का बसला.सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. आमदार शहाजी बापू पाटील यांच्या चिकमहुद तालुका सांगोला येथील मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्त्यांची विचारविनिमय बैठक संपन्न झाली. यावेळी पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सांगोला तालुक्यावर व माझ्यावरती खूप प्रेम आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगोला मतदार संघाच्या विकासासाठी तब्बल 5500 कोटी रुपयांचा विकास निधी मिळाला.

या निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी कार्यकर्त्यांनी पराभवामुळे खचून जाऊ नये व नाराजही होऊ नये. आपण सर्वांनी मोठ्या जिद्दीने, धाडसाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविल्याशिवाय स्वस्त बसायचे नाही असा निर्धार यावेळी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागावे यापुढे सर्वांनी एकदिलाने काम करावे तालुक्याच्या विकासासाठी निर्णयाची जबाबदारी, राजकारणाची जबाबदारी कार्यकर्त्यांनी माझ्यावर सोपवली असून मी दिलेला शब्द कार्यकर्ते पाळणार आहेत असे ते म्हणाले.