शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केल्यापासून सांगोला विधानसभा मतदारसंघात दररोज हजारो कार्यकर्ते शिवसेना पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या परिवारात सामील होत आहेत. सांगोला तालुक्यातील अनेक गावातील प्रश्न, अडथळे दीपक आबांनी वाड्यावस्त्यांवर जाऊन सोडवलेले आहेत. त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न तसेच अडचणीतून बाहेरही काढलेले आहे. त्यामुळे आता भावी आमदार दीपकआबाच व्हावेत यासाठी सांगोला तालुक्यातून अनेक गावातील नागरिक, कार्यकर्ते खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत.
आजवर सांगोला विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी निवडणुका झाल्या की भाळवणी जिल्हा परिषद गटाकडे अपेक्षित लक्ष दिले नाही त्यामुळे या गटातील जनता आता त्याच त्या नेत्यांच्या आश्वासनाला कंटाळली आहे. म्हणून भाळवणी जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनतेने आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिपकआबा साळुंखे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे. भाळवणी जिल्हा परिषद गटातून दिपकआबांना विक्रमी मताधिक्य देण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे पक्षात नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.