पेठ-सांगली रस्ता कामाने शेतकरी, व्यावसायिकांचे नुकसान, नुकसान भरपाई मागणी

गेली दोन वर्षे चालू असलेल्या पेठ-सांगली रस्ते कामाने रस्त्या शेजारील लहान मोठ्या व्यावसायिकांचे तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने मशागत, पेरणी विना शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.तसेच या मार्गावरील शेतात असणारा ऊस हा तोडणी करून रस्त्यावर कसा आणायचा ? या खर्चाला व नुकसानीला जबाबदार असणाऱ्या ठेकेदार यांच्याकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार इंजिनिअर सेलच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन सेलचे जिल्हाध्यक्ष संजय रानमाळे पाटील, इंद्रजित रानमाळे, विजय  माळी यांनी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, कोल्हापूर, जिल्हाधिकारी सांगली, अप्पर तहसीलदार आष्टा यांना दिले.