दानोळीत सर्पमित्र हिंदुराव तिवडे यांच्याकडून नागास जीवदान, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

अनेक भागात अलीकडच्या काळात अनेक प्राणी पहावयास मिळत आहेत. काही ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे. अनेक ठिकाणी साप, नाग सऱ्हास पहायला मिळत आहेत. दानोळी येथील कुंभोज रस्त्यालगत असलेल्या पवार मळ्यात शिवाजी पवार यांच्या घरामध्ये जवळपास सहा फुटांचा भला मोठा नागसर्प  आढळून आला. यामुळे कुटुंबीयांची व येथील नागरिकांची चांगलीच भंबेरी उडाली होती.

तत्काळ येथील सर्पमित्र असलेल्या हिंदुराव तिवडे (देवा) यांच्याशी संपर्क साधण्यात आला. सर्पमित्र असलेल्या तिवडे यांनी शिताफीने नागाला पकडले व त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला. यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दानोळी व परिसरात अति विषारी सर्प आढळून येत असल्याने नागरिकांच्यात भीतीची वातावरण आहे.