हातकणंगले येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीजवळ वीज वाहिन्या दुरुस्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले होते. एका वाहिनीची दुरुस्ती सुरू असताना जवळून गेलेल्या दुसऱ्या वीज वाहक तारेला समीर कामसे याला स्पर्श झाला. जवळील असलेल्या कर्मचाऱ्यांनी सावधानता बाळगत उपाययोजना करून कापसे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार सुरू झाल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र ही घटना घडू नये याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खबरदारी घेणे आवश्यक होते.
मात्र अधिकाऱ्यांनी ती काळजी घेतली नाही. वीज वाहिनीचे काम सुरू करताना शेजारील वीज वाहिनीचा प्रवाह बंद केला आहे की नाही याची चौकशी करणे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गरजेचे होते. परंतु अधिकाऱ्याने अजिबात दक्षता घेतली नाही. यामुळे हातकणंगले येथील एका कर्मचाऱ्याला गंभीर जखमी व्हावे लागले. सुदैवाने तो बचावला. मात्र खबरदारी घेतली असती तर त्याच्यावर हा प्रसंग ओढवलाच नसता अशा संतप्त प्रतिक्रिया सध्या उमटू लागल्या आहेत. या अधिकाऱ्यांवर वरिष्ठ काय कारवाई करतात हे आता पहावे लागणार आहे.