इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये राहुल आवाडे यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला. आवडे घराण्यात पहिल्यांदा आमदार तसेच मंत्रीपद मिळवणे ही परंपरा दोन पिढ्यांपासून चालत आलेली आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे यांची पहिल्याच आमदारकीत मंत्रिमंडळाची माळ गळ्यात घालून घेण्याची परंपरा ही राहुल आवाडे यांच्यापर्यंत पोहोचणार का? याची उत्सुकता इचलकरंजीतील तमाम जनतेला लागलेली आहे.
आवडे घराण्याचे विधानसभेत पाऊल टाकल्यानंतर लगेचच मंत्रिपद मिळवण्याची दोन पिढ्यांची परंपरा आहे. आता तिसऱ्या पिढीतील राहुल आवाडे यांचे देखील पहिल्यांदाच विधानसभेमध्ये पाऊल पडले आहे. आवाडे घराण्याची तिसरी पिढी राहुल आवाडे यांनी राजकारणात पदार्पण करत पहिल्या प्रयत्नातच प्रचंड मताधिक्याने आमदार ही झाले आहेत. राहुल आवाडे हे आपले आजोबा, वडील यांच्याप्रमाणे पहिल्या वेळीच मंत्री होण्याची परंपरा कायम ठेवणार का? याबाबत सध्या इचलकरंजी शहरांमध्ये जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. इचलकरंजीला राहुल आवाडे यांच्या रूपाने मंत्रीपद मिळणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे.