विटा नगरपालिकेसाठी पेरणी सुरू, आमदार सुहासभैया बाबर व अध्यक्ष तानाजीराव पाटील पोहोचले घुमटमाळला….

काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. सुहासभैय्या बाबर प्रचंड मताधिक्याने निवडून आले. यामध्ये विटा शहराने सुहास भैया बाबर यांना खूप मोठे मताधिक्य दिले. यामध्ये माजी नगरसेवक धर्मेश पाटील यांनीही अनेकांना धक्के देत आटपाडीचे नेते तानाजीराव पाटील यांच्या आशीर्वादाने सुहास बाबर यांना पाठिंबा देऊन मोठी खळबळ उडवून दिली होती..

आज धर्मेश पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने होत आहे. त्यामुळे शुभेच्छा स्वीकारण्यात ते व्यस्त होते. आमदार सुहासभैय्या बाबर यांनी घुमटमाळ येथे जाऊन धर्मेश पाटील यांना शुभेच्छा दिल्या. ते येणाऱ्या विटा नगरपालिका निवडणूकसाठी तयारी सुरू असल्याचे संकेत या निमित्ताने आमदार बाबर यांनी दिले.

विटा शहरातून मला मिळालेला जनादेश हा विधानसभेसाठी नसून विटा नगरपालिका साठी आहे असे बाबर यांनी यापूर्वीच विजय मिरवणूकित घोषित केले आहे. या शुभेच्छा प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर, आटपाडी तालुक्यातील मान्यवरांसह बाबर समर्थकांनी गर्दी केली होती.