येणाऱ्या सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष म्हणून मोठ्या ताकदीने लढणार असल्याचे अनिल सावंत यांनी जाहीर केले. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय मंगळवेढा येथे आयोजित महाविकास आघाडी विचारमंथन बैठकीप्रसंगी ते बोलत होते.अनिल सावंत पुढे बोलताना म्हणाले की, कमी दिवसांमध्ये तो काळ मिळाला त्या काळाचे नियोजन करणे, प्रत्येक गावात जाणे, प्रत्येक नागरिकांना भेटणे याचे नियोजन कमी झाले, आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी निवडणूक लढवली, सर्वांनी मोठ्या ताकदीने मला साथ दिली मी स्वतः या पराभवाची जबाबदारी घेतली आहे.
जो निवडणुकीचा निकाल लागला यावरून शरद पवार साहेब, व उद्धव ठाकरे साहेब यांना संपवण्याचा कुटील डाव सरकारने केला आहे. भाजपच्या उमेदवाराविरोधात महाविकास आघाडीचा एक उमेदवार पाहिजे होता, पण वरिष्ठ पातळीवर याची दखल घेतली गेली नाही.
शरद पवार साहेब प्रत्येक मतदारसंघात बैठक घेणार आहेत, आपल्या मतदारसंघात बैठक होईल. बरेच ठिकाणी आपल्या लोकांनी मतदान केले आहे. तुतारी म्हणून आम्ही मतदान केले आहे तरीपण आपल्याला यश मिळाले नाही. यापुढेही मोठ्या ताकदीने अनिल सावंत जनतेसाठी काम करणार आहे. चोरी करून निवडणुका जिंकल्या असल्याचा हल्लाबोल अनिल सावंत यांनी केला.आजपासून कामाला लागून प्रत्येक गावात शाखा सुरू करून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी 24 तास काम करणार आहे. प्रत्येक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी प्रामाणिक काम करावे येणाऱ्या काळात 2029 ला आपला विजय निश्चिंत असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला.