खानापूर मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीतील बाद संपल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीकडून युवानेते वैभवदादा पाटील यांची उमेदवारी फायनल झाली आहे. विश्वसनीय सूत्रांकडून ही महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. आज सायंकाळपर्यंत वैभव दादा पाटील यांच्या नावाची घोषणा होणार असल्याचे देखील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. वैभव दादा पाटील आजच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी म्हणजेच 28 ऑक्टोंबरला भव्य रॅलीसह वैभव दादांचा उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू झालेली आहे.
वैभव दादांचा अर्ज भरण्यासाठी सुप्रियाताई सुळे, निलेश लंके आणि अमोल कोल्हे उपस्थित राहण्याबद्दल हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार माजी आमदार ॲड. सदाशिवभाऊ पाटील यांच्या कुटुंबीयांसह राजेंद्र अण्णा देशमुख मुंबईकडे रवाना झालेत. आज सायंकाळी प्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान वैभव दादा पाटील यांना एबी मिळणार असल्याचे बोलले जाते.