वाळवा तालुक्यातील कारंदवाडी ग्रामपंचायतीला सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने २०२४-२५ करिता आयएसओ मानांकन देऊन गौरवण्यात आले. केंद्र शासन व महाराष्ट्र शासन राज्यात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मानांकनासाठी कारंदवाडी ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. शासनाच्या सर्व निकषांमध्ये कारंदवाडी ग्रामपंचायतीने उच्च गुण प्राप्त करीत उल्लेखनीय कामगिरी केली. ७५व्या संविधान दिनाचे औचित्य साधून कारंदवाडी ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन देण्यात आले.
कारंदवाडीचे सरपंच हिंमत पाटील, उपसरपंच रूपाली सावंत यांनी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी सर्व सदस्य ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. कारंदवाडी ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याबद्दल सरपंच, उपसरपंच यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे. आयएसओ मानांकन मिळाल्यानंतर विविध मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.