इस्लामपूर-आष्टा, वाळवा मार्गे बससेवा सुरू करण्याची मागणी…..

आष्टा येथे आष्टा ते पेठ वडगांव एस.टी. बस दर तासाला सुरू आहे. वाळवा इस्लामपूर आगाराने दोन तासांतून एकदा इस्लामपूर वाळवा मार्गे आष्टा ही बससेवा सुरू करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. वाळवा येथून सांगली किंवा पेठवडगाव अथवा हातकणंगले, इचलकरंजी येथे जायचे असेल तर आष्ट्यापर्यंत जायला एस.टी. बस नाही. वाळवा ते सांगली बस वेळेवर मिळत नाही. कधी कधी फेऱ्या रद्द होतात. आष्टा येथे पोहोचले की इस्लामपूर, कऱ्हाड, सातारा, पुणे, मुंबई, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथून येणाऱ्या एस.टी. बस सांगली येथे जाण्यासाठी मिळतात.