भारतीय जनता पार्टीच्या पुढाकारातून आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आष्टा येथील वग्याणी प्लॉटमध्ये रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. संदीप आवटी आणि अमोल शिंदे यांच्या हस्ते रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रवीणभाऊ माने, संदीप गायकवाड, संजय सावंत, शिवप्रसाद भोसले,सोयब संदे,सोयब शेख, अभिजीत परीट, राहूल भागवत यांच्यासह स्थानिक नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना प्रवीणभाऊ माने म्हणाले,जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि पालकमंत्री सुरेश खाडे तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या सहकार्यातून मंजूर झालेल्या वग्याणी प्लाॅटमध्ये रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ करताना आनंद होत आहे.
या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे अशी येथील नागरिकांची इच्छा होती. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करताना आनंद होत आहे. भावी काळात या परिसरातील समस्या अग्रक्रमाने सोडविणार आहोत.स्वागत आणि प्रास्ताविक संदीप आवटी यांनी केले. आभार अमोल शिंदे यांनी मानले.