हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. अन्यथा वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. थंडी चालू झाल्यानंतर सगळीकडे रोगराई पसरू लागते. शिवाय या दिवसांमध्ये साथीचे आजार वेगाने पसरतात. त्यामुळे थंडी चालू झाल्यानंतर जीवनशैलीमध्ये आणि खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय करावे, याबद्दल सांगणार आहोत.
उबदार कपडे घालणे:
हिवाळ्यामध्ये साथीचे आजार वाढण्याची शक्यता असते. तसेच रात्रीच्या वेळी वातावरणात थंडावा असतो. त्यामुळे रात्री झोपताना किंवा दिवसाच्या वेळी उबदार कपडे परिधान करावे. ज्यामुळे शरीराचे थंडीपासून नुकसान होणार नाही. शिवाय हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वेटर किंवा इतर थंडीपासून बचाव करणारे कपडे परिधान करावे.
सतत पाणी पिणे:
सर्वच ऋतूंमध्ये शरीर हायड्रेट ठेवणे फार गरजेचे आहे. उन्हाळ्यात जशी शरीराला पाण्याची आवश्यकता असते, तशीच आवश्यकता हिवाळ्यात सुद्धा असते. त्यामुळे पाण्याचे भरपूर सेवन करावे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर आजारांपासून दूर राहते.
गरम अन्नपदार्थांचे सेवन करणे:
थंडीच्या दिवसांमध्ये रात्रीच्या वेळी किंवा इतर वेळी गरम अन्नपदार्थ जेवण्याचा प्रयत्न करावा. गरम आणि पौष्टिक अन्नपदार्थ खाल्यामुळे शरीराला योग्य ते पोषण मिळण्यास मदत होते. गरम पाणी, सूप, गरम दूध किंवा गरम अन्नाचे सेवन करावे. तसेच हिवाळ्यात जास्त बाहेरच्या पदार्थांचे सेवन केल्यास आजारी पडण्याची शक्यता असते.
चादरीचा वापर करणे:
थंडीपासून बचाव करण्यासाठी रात्री झोपताना जाडसर चादर वापरावी. यामुळे सर्दी, खोकला किस्वा इतर आजार होणार नाहीत. हिवाळ्यात तापमान कमी होत जाते. कमी झालेल्या तापमानाचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.
कुलरचा वापर करणे टाळावे:
थंडीच्या दिवसांमध्ये कुलरचा वापर करू नये. यामुळे थंडी आणखीन वाढण्याची शक्यता असते. जास्त थंड वातावरणात राहिल्यामुळे सर्दी, खोकला, ताप आणि इतर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री झोपताना पंख्याच्या हवेचा वापर करावा. पण तापमानात घट झाल्यास पंखा किंवा कुलर वापरू नये.