आळतेत शनिवारी, रविवारी होणार गजर हरिनामाचा कार्यक्रम

हातकणंगले तालुक्यातील आळते येथे गजर हरिनामाचा कार्यक्रमाचे आयोजन केले असून दोन दिवस चालणाऱ्या कीर्तन महोत्सवात श्री गुरू माऊली भगवती महाराज सातारकर व चिन्मय महाराज सातारकर यांच्या अमृत वाणीतून टाळ-मृदंगाच्या गजरात कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.कार्यक्रम शिवतेज शाळेच्या पटांगणात शनिवारी (ता. ७) आणि रविवारी (ता. ८) सायंकाळी सहा ते आठ या वेळेत होणार आहे. हरी भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक संजय दीक्षित व मयुरी दीक्षित यांनी केले.