कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने धडाकेबाज यश मिळवल्यानंतर आता मंत्रिपदाबरोबरीने पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी नवनिर्वाचित आमदारांमध्ये जोरदार चुरस दिसत आहे. इचलकरंजी मतदारसंघात डॉ. राहुल आवाडे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले.पहिल्यांदा निवडून आल्यानंतर कल्लाप्पाण्णा आवाडे व प्रकाश आवाडे या पितापुत्रांना राज्य मंत्रिपद मिळालेले होते. त्यामुळे त्यांच्या तिसऱ्या पिढीतील राहुल आवाडे यांना असेच मंत्रिपद मिळेल अशा अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळकीचे संबंध असल्याने शिवाजी पाटील यांच्या समर्थकांनाही त्यांची वर्णी लागेल असे वाटत आहे.
Related Posts
आमदार आवाडेंच्या वक्तव्याचा निषेध!
तारदाळ येथील दहा एकर गायरान जागा डीकेटीई संस्थेने ४० वर्षांपूर्वी क्रीडांगणासाठी म्हणून भाडेतत्त्वावर घेतली आहे. या क्रीडांगणाच्या जागेला बंदिस्त कुंपण…
इचलकरंजीत सायझिंगला आग! २० लाखाचे नुकसान
इचलकरंजीत कारखान्यांची संख्या भरपूर आहे. अनेक परगावाहूनलोक या ठिकाणी रोजगारासाठी स्थायिकआहेत.इचलकरंजीतील खंजिरे औद्योगिक वसाहतीमधील एका सायझिंगला शॉर्टसर्किटने आग लागली. या…
नळांना दुर्गंधीयुक्त काळे पाणी!नागरिकातून संताप
इचलकरंजीचा पाणीप्रश्न तर खूपच बिकट आहे त्यातच आता पाण्याचे वेळापत्रक कोलमंडलेले आहेच. इचलकरंजी येथील कलानगर जमदाडे मळा बुगड खानावळ परिसरामध्ये…