लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? मुख्यमंत्री होताच फडणवीस म्हणाले…

राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झालं आहे. या नव्या सरकारमध्ये राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे आला आहे. म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झाले आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील. दरम्यान, निवडणुकीत महायुतीने लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर हे पैसे नेमके कधी मिळणार? असे लाभार्थी महिलांकडून विचारला जात होते. यावरच देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केले आहे. आगामी अर्थसंकल्पात आम्ही त्यावर विचार करू, असं फडणवीस यांनी सांगितलंय. देवंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी  मुंबई आझाद मैदानावर मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली.

त्यानंतर मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत वाढीव हप्ता कधी मिळणार? असे त्यांना विचारण्यात आले. यावर बोलताना “सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहेत. तसेच महिलांना मिळणारा लाभ 2100 रुपये करणार आहोत. आता अर्थसंकल्पाच्या वेळी आम्ही त्याचा विचार करू. शेवटी आपले आर्थिक योग्य प्रकारे चॅनेलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.