देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नेतृत्वात भाजपला आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवून दिल्यानंतर ते तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका त्यांनी विधानसभा निवडणुकीत भरुन काढला. एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपद मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली. पण त्यांची मनधरणी करुन फडणवीसांनी त्यांना मंत्रिमंडळात सहभागी करुन घेतलं. आम. विनय कोरे, आम हसन मुश्रीफ या दोन्ही नेत्यांना मंत्रीपद मिळणार हे गुरुवारी पक्के झाले आहे.
पण, जनसुराज्यच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद येणार नसेल तर राज्यमंत्रीपदासाठी आम. डॉ. अशोकराव माने यांचे नाव निश्चित मानले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला आम. राहुल आवाडे, आम. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर या दोन नावांच्यावरही चर्चा झाली आहे. आम प्रकाश आबिटकर, आम. राजेश क्षीरसागर यांचीही नावे कुतूहलाने चर्चेत होती. तथापी आम. विनय कोरे कॅबिनेट मंत्रीपदासाठीच आग्रही आहेत. पहावे लागेल, माने की कोरे, संधी कोणाला मिळते ?