हातकणंगले तालुक्यात नवरात्रौउत्सवासाठी गावागावात सजली मंदिरे…

हातकलंगले तालुक्यात नवरात्रौउत्सवाचे विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे .यानिमित्त मंदिराची स्वच्छता, देवीचे अलंकार ,पालखी पूजेतील पितळेची भांडी आदीची स्वच्छता करण्यात आली आहे .गुरुवारी नवरात्रौउत्सवाला सुरूवात होणार असून, मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात येणार आहे. नवरात्रौउत्सवाच्या दोनच दिवसात भक्तीभावाने सुरुवात होणार आहे .दुर्गामातेच्या आगमन व त्यानंतर दसरा सणाचे वेध सर्वांनाच लागले आहेत. गावागावांतील मंदिरे सजली असून ,आगामी 9 दिवस दररोज धार्मिक कार्यक्रमाचे मंदिरात रेलचेल सुरू होणार आहे .त्याचबरोबर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान कडून काढण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडलाही युवकाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे .नवरात्रौउत्सवाच्या काळात मंदिरामध्ये 9 दिवस विविध रूपातील देवीचे पूजा बांधली जाते.