सांगोला विधानसभा मतदारसंघात नुकतीच तिरंगी लढत झाली होती. शिवसेना महायुतीचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांचा शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांच्याकडून पराभव झाला आहे. तर, शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार दिपक साळुंखे यांनाही पराभव पत्करावा लागला. विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या निमित्तानं आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत आशिर्वाद घेऊन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी पहिल्या दिवशी विधान भवनात प्रवेश केला.यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब,कष्टकरी,शेतकरी मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळं निवडून आलो असल्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.