अशोकराव माने, शिवाजी पाटील यांना मंत्रीपदाची संधी द्या

आमदार डॉ. अशोकराव माने, आम. शिवाजीराव पाटील या दोन्ही नेत्यांनी शालेय जीवनापासून सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. आर्थिक कुवत नसताना त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवले. हे दोन्ही नेते गरीबीची जाण आणि सामाजिक न्यायासाठी धडपडणारे आहेत. संघटन कौशल्य असणारे आहेत, प्रशासन हाताळण्याची त्यांच्याकडे कुवत आहे. शिवाय सामान्य कुटूंबातून आले आहेत, त्यांनी अनेक खस्ता खाल्ल्या आहेत.

या दोन्ही नेत्यांना तात्काळ १० डिसेंबर रोजी होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात मंत्री म्हणून स्थान मिळावे, अशी अपेक्षा राधानगरी, आजरा, शाहूवाडी पन्हाळा, कागल, करवीर, कोल्हापूर उत्तर विभागातून होत आहे. दोन्ही नेत्यांनी शालेय जीवनापासून सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. लोकांच्या बळावर आणि नेत्यांचे पाठबळ यांच्या जोरावर त्यांना संधी मिळाली. संधीचे सोने करण्यासाठी दोन् आमदारांना मंत्री करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.