हातकणंगलेच्या खासदारांना गद्दारी भोवणार……

तुम्हा सर्वांना माहितच आहे कि लोकसभा निवडणुकीच्या तयारीत प्रत्येक पक्ष आहे. अनेक नेतेमंडळी अनेक ठिकाणी दौरे करत आपापल्या पक्षाची मोर्चेबांधणी देखील करत आहेत. गत निवडणुकीत धैर्यशील माने यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार करण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं, मात्र त्यांनी गद्दारी केली.

या निवडणुकीत त्यांचा गद्दारीचा हिशेब चुकता करून बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक निवडून चूक सुधारूया, असे आवाहन उध्दव ठाकरे शिवसेना युवासेनेचे राज्यसचिव वरुण सरदेसाई यांनी केले. ते मांगले (ता शिराळा) येथे आयोजित केलेल्या युवासेना पदाधिकारी भेट व संवाद दौऱ्यात मार्गदर्शन करीत होते.