शिवाजीनगर पोलिसांकडून चोरीच्या ४ दुचाकी जप्त,१लाख १७हजाराचा मुद्देमाल हस्तगत! चोरीचे ४ गुन्हे उघड

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २ डिसेंबर रोजी रोजी मध रोहन कांबळे,शिरदवाड यांची राणी बागेजवळ लावलेली हिरो होंडा सी डी डीलक्स मोटारसायकल चोरीचा गुन्हा नोंद झाला होता. उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या सूचनेनुसार तपास करत असताना आरोपी मोटारसायकलचे भाग सुटे करनार असल्याची माहिती मिळाल्याने तपास केला असता सागर आप्पासो चव्हाण  वय ३२,गोसावी गल्ली,रा.इचलकरंजी,अवधूत यशवंत परीट,वय २७,केटकाळे गल्ली,इचलकरंजी,स्वप्निल भगवान मुदगल वय ३८ ,रा.गोसावी गल्ली. इचलकरंजी हे स्वप्नील मुदगल याच्या गॅरेजमध्ये मोटारसायकल खोलत असताना आढळुन आले.

त्यांच्याकडून निळी हिरो होंडा सीडी १०० MH 09-BS 2180,हिरो होंडा स्प्लेंडर प्लस MH 09 CP 7322,स्प्लेंडर प्लस MH 09 CH -8663, एक्टिवा सिल्वर कलरची MH 09 AR-6684,त्याचबरोबर स्प्लेंडर मोटर सायकलची सुट्टे पार्ट असा १ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून शिवाजीनगर पोलीस स्टेशन मधील तीन तर कुरुंदवाड पोलीस स्टेशन मधील १ असे ४ गुन्हे उघडकीस आले आहेत. शिवाजीनगर पोलिसांना चोरीच्या ४ मोटर सायकली जप्त करून १लाख १७ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करत चोरीचे ४ गुन्हे उघड करण्यात यश मिळवले. शिवाजीनगर पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाने सदर कारवाई केल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.

वरील कारवाई जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडीत,अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिंह साळवे,पो.नि.सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि शरद वायदंडे,सहा.फौजदार रावसाहेब कसेकर,पो.अं.सुनिल बाईत,पो.अं.गजानन बरगाले,पो.अं.विजय माळवदे,अविनाश भोसले,अरविंद माने,सतिश कुंभार यांनी केली.