पॅरामेडिकलसाठी ‘भैरवनाथ’मध्ये प्रवेश सुरू…

कोरोची (ता. हातकणंगले) येथील भैरवनाथ शिक्षण संस्थेमध्ये नर्सिंग व पॅरामेडिकलसाठी प्रवेश सुरू झाला आहे. याबाबतची माहिती संस्थेतर्फे दिली.महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ, मुंबई मान्यताप्राप्त एएनएम (दोन वर्षे), जीएनएम (तीन वर्षे) व पॅरामेडिकलचे ओटी, एक्स-रे, ईसीजी, रेडिओलॉजी, नेत्ररोग तंत्रज्ञ, डायलेसीस आदींसाठी प्रवेश सुरू आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे कला शाखेसाठी प्रवेश नोंदणी सुरू आहे. बारावी उत्तीर्णांना प्रवेश घेता येत असल्याची माहिती केंद्र संयोजकांनी दिली.