हातकणंगलेत आज वधू-वर मेळावा

हातकणंगले तालुका व इचलकरंजी शहर लिंगायत परीट महासंघाच्या वतीने रविवार ता. ८ डिसेंबर रोजी हातकणंगले येथील बुधले मंगल कार्यालयामध्ये वधू वर सूचक मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नुतन आम. अशोकराव माने आहेत. मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून अभिजीत अर्जुन परीट (कुपवाड ) व महादेव मडिवाळ (अथणी) हे राहणार आहेत. मेळाव्यासाठी परिट महासंघाचे विठ्ठल परीट, मनोहर परीट, राजकुमार परीट, अॅड. निता संतोष परीट हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी लिंगायत समाजातील युवक- युवतींनी या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष बजरंग कोरे, उपाध्यक्ष अनिल कोरे, दन्यपा परीट, अशोक परीट, संतोष परीट, अमोल परीट, शंकर अगसर, सचिन आरगे यांनी केले आहे.