अलीकडे वातावरणातील बदलामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. इचलकरंजी शहर आणि परिसरामध्ये डेंगूसदृश्य ताप, चुकूनगुनीया या साथींच्या आजारांचे रुग्ण संख्या वाढत आहे. प्रशासनाने व आरोग्य विभागाने संयुक्तपणे साथीचे रोग नियंत्रित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
खड्डेमय रस्त्यावर साचत असलेले पाणी, तुंबलेल्या गटारी, न उचललेल्या कचरा यामुळे शहरात डासांची उत्पत्ती वाढलेली आहे. यामुळे साथीचे रोग भरपूर प्रमाणात वाढत आहेत. परिणामी शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात डेंग्यूताप, चिकनगुनिया अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. उपचार खर्चाने सामान्य बेजार झाले आहेत. शासकीय आरोग्य यंत्रणांनी अधिक प्रभाविपने उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
