मित्रानो अलीकडच्या काळात अनेक नवनवीन मोठ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. अनिल अंबानी (Anil Ambani) यांची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्सने (Reliance general insurance) नवीन आरोग्य विमा पॉलिसी लॉन्च केली आहे. त्यात अनेक मोठे आजार आणि त्यांच्या उपचारांचा समावेश करण्यात आला आहे.
मुकेश अंबानी यांचे बंधू उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्सने (Reliance general insurance) नवीन आरोग्य विमा पॉलिसी लॉन्च केली आहे. त्यात अनेक मोठे आजार आणि त्यांच्या उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, विमा घेणाऱ्या व्यक्तीला जगात कुठेही उपचार घेण्याची सुविधा देण्यात आली आहे.
कर्करोग किंवा बायपास शस्त्रक्रियेचा खर्च समाविष्ट
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने भारतीय ग्राहकांसाठी ‘रिलायन्स हेल्थ ग्लोबल’ पॉलिसी लाँच केली आहे. त्याच्या मदतीने भारतीय लोक जागतिक स्तरावरील आरोग्य सुविधांचा लाभ घेऊ शकतील. ही पॉलिसी केवळ भारतातच नाही तर जगभरातील ग्राहकांना सर्वसमावेशक आरोग्य कवच प्रदान करते. मिळालेल्या माहितीनुसार, या आरोग्य विम्याअंतर्गत लोकांना कॅन्सर आणि बायपास सर्जरीसारख्या गंभीर आजारांच्या उपचारांसाठीही कवच मिळणार आहे. असा आजार केवळ देशातच नाही तर परदेशातही आढळल्यास त्याच्या उपचाराचा खर्च या विम्यांतर्गत कव्हर केला जाणार आहे.
‘हेल्थ ग्लोबल’ पॉलिसीमध्ये ग्राहकांना 1 दशलक्ष डॉलर्सपर्यंतचे कव्हर मिळू शकते. रुपयात ही रक्कम 8.30 कोटी रुपये येते. विम्याच्या रकमेव्यतिरिक्त, निवास, प्रवास आणि परदेशात व्हिसा संबंधित मदत देखील या पॉलिसीचा एक भाग असणार आहे.
एअर अॅम्ब्युलन्सपासून ते अवयवदानापर्यंत
या पॉलिसी अंतर्गत, तुम्ही उपचारासाठी खासगी खोली देखील बुक करु शकता, कारण खोलीच्या भाड्यावर कोणतीही निश्चित मर्यादा नाही. त्याचवेळी, ग्राहकांना एअर अॅम्ब्युलन्स आणि अवयव दात्याकडून अवयव खरेदीवर झालेल्या खर्चावर विमा संरक्षण देखील मिळेल. कंपनीचे सीईओ राकेश जैन म्हणतात की, भारतात आता जागतिकीकरण होत आहे. देशातील अनेक लोक परदेशात जातात. अशा परिस्थितीत त्यांना या पॉलिसीमधून चांगले आरोग्य कवच मिळेल.