वाठार येथे शनिवारी श्री दत्तजयंती सोहळा,रविवारी महाप्रसाद

हातकणंगले तालुक्यातील वाठार येथील श्री दत्त देवस्थानतर्फे शनिवारी (ता. १४) श्री दत्तगुरूंचा जन्मकाळ, पालखी सोहळा, रविवारी (ता. १५ )महाआरती व महाप्रसादाचे आहे.शनिवारी सायंकाळी सहाला दत्तगुरूंचा जन्मकाळ, पालखी सोहळा, रविवारी सकाळी ७ ते ११ रूद्राभिषेक, महापूजा महारुद्राचे हवन व श्री पवमान सुक्ताचे हवन १२.३० ला महाआरती व पूर्णाहुती दुपारी १ वाजता महाप्रसाद असे कार्यक्रम होतील. याचा भाविकांनी लाभ घ्यावा; असे आवाहन प्रसाद महाराज, वेदमूर्ती अवधूत महाराज यांनी केले आहे.