आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील शेतकरी यांनी निवेदनात म्हटले आहे की, शक्ती पीठ महामार्ग हा आमच्या सांगली जिल्हयातील आटपाडी तालुक्यातुन जाणारा आहे. या शक्ती पीठ महामार्गामुळे या भागातील दळण वळण वाढणार असून त्या शक्ती पीठ मार्गामुळे या भागाचा कायापालट होणार आहे. सदर शक्तीपीठ महामार्ग होणेस आमची कसल्याही प्रकारची तक्रार व हरकत नाही.
सदर महामार्ग होत असताना या परिसरातील असणारी शेतकऱ्यांची बागायत शेत जमीन या शक्ती पीठ मार्गाच्या रस्त्यामध्ये संपादीत झाल्यास त्याचा संबंधीत शेतकऱ्यास चांगला मोबदला मिळावा कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होवु नये याची जबाबदारी संबंधीत प्रशासनाने घेण्यासाठी आपण आदेश करावेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही व शक्ती पीठ महामार्ग झाल्याचे समाधान शेतकऱ्यांना होईल.
या शक्ती पीठ महामार्गासाठी कांही समाजकंठक व एंजटगिरी करणाऱ्या लोकांनी शेतकऱ्यांना वेठीस धरुन शक्ती पीठ महामार्गाबाबत दिशाभुल करुन अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्या लोकांच्याकडे दुर्लक्ष करुन शक्ती पीठ महामार्गाचे काम सुरु करावे. सदर महामार्गामुळे जमीन संपादित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मोबदला मिळावा. सदर शक्ती पिठ महामार्ग तातडीने सुरु करण्याबाबत आदेश करावेत.
यासाठी आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील शशिकांत नानासो मोरे, पोपट मोरे, शरद मोरे, शशिकांत बाबर, जगन्नाथ बाबर, रमेश गायकवाड, नागनाथ मोरे, रामचंद्र मोरे, दत्ताजी मोरे, वसंत मोरे, विपुल गायकवाड, नानास बोधगिरे, शिवाजी मोरे, पिंटू सलगरे, युवराज मोरे आधी शेतकऱ्यानी मुख्यमंत्री प्रांत अधिकारी तहसीलदार यांना सहीनिशी निवेदन दिले आहे.