आष्टा येथील श्री बस स्थानका पाठीमागील ग्रामीण रुग्णालयानजीक असलेल्या रेणुका देवीची मार्गशीर्ष पौर्णिमा यात्रा व श्री दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे ७ ते १४ अखेर आयोजन केले आहे.
१३ रोजी रात्री ७ वाजता परडी सोडणे व रात्री १० वाजता गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. १४ रोजी सकाळी ११ वाजता महापूजा व नैवेद्य, दुपारी २ वाजता श्री रेणुका सहस्राहुती होम, पालखीची मिरवणूक, सायंकाळी ५ ते ८ महाप्रसाद, रात्री १० वाजता श्री रेणुका देवीचा किच असे कार्यक्रम होणार आहेत.
आष्ट्यात रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम
