गलाईला लघु सूक्ष्म उद्योगाचा दर्जा मिळवून देणार सुहासभैया बाबर यांची ग्वाही…..

करगणी येथील भाजपमधील मान्यवर मंडळींनी आणि लोणारी समाज बांधवांनी बाबर यांना पाठिंबा दिला. तसेच विटा फुलेनगर येथील वैभव सुनीलभाऊ कांबळे यांच्या सहकाऱ्यांसोबत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी रिक्षाचालक संघटनेचे नेते पांडुरंग भिंगारदिवे उपस्थित होते.

गलाई बांधवांच्या व्यवसायाला स्थिरता आणण्यासाठी लघु सूक्ष्म उद्योगाचा दर्जा मिळवून देणार असल्याची घोषणा खानापूर आटपाडी विसापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहासभैया बाबर यांनी केली आहे.

सुहास बाबर म्हणाले, राजकारण व समाजकारण करत असताना आपण ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतो तेथील सर्व घटकांचा समतोल विकास झाला पाहिजे अशी आमची भूमिका राहिली आहे. अनिलभाऊंनी हीच भूमिका ठेवून वाटचाल केली त्यामुळे आमचे सर्वांशी जिव्हाळ्याचे, आपुलकीचे व प्रेमाचे नाते निर्माण झाले आहे.

ते म्हणाले माता अहिल्यादेवींची शिल्पसृष्टी उभारली जाईल मतदारसंघात खिलार जनावरांचे संवर्धन व संगोपन केंद्र उभारणे, आटपाडी तालुक्यात लोकर, घोंगडी उत्पादन या व्यवसायाला चालना देणे तसेच शेळी, मेंढी पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.