आटपाडीचे अशोक पवार यांना केंद्रीय पत्रकार संघाकडून आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीरउद्या पार पडणार सन्मान सोहळा 

नुकताच पत्रकार दिन उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलेले होते. या पत्रकार दिनादिवशी अनेक पत्रकारांचा सन्मान देखील करण्यात येतो. तसेच आदर्श पत्रकार पुरस्कार देखील प्रदान केला जातो. आटपाडीचे अशोक पवार याना केंद्रीय पत्रकार संघाकडून आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. तरी हा सन्मान सोहळा उद्या शुक्रवार दि १०/०१/२५ रोजी विश्रामबाग येथील रोटरी हॉलमध्ये पार पडणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार श्री सत्यजित देशमुख असणार आहेत.