देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
यांच्या अभिनंदनासाठी मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर अनेक सदस्य बोलले. उपमुख्यमंत्री अजित पवार जयंत पाटील यांना उद्देशून म्हणाले की, माझे पूर्ण लक्ष तुमच्यावर आहे.
तेव्हा लगेच जयंत पाटील यांनी उत्तर दिले की, दादा राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्रीदवाक्यच आहे की, योग्य वेळी योग्य निर्णय. त्यामुळे जयंत पाटील यांचा योग्य वेळी योग्य निर्णय कसा आणि काय होतो, याकडे आमचे लक्ष लागून आहे. जयंत पाटील यांनी आता ठरवायचे आहे. जयंत पाटील ज्येष्ठ नेते आहेत. जयंत पाटील यांनी अनेक वर्ष अर्थसंकल्प मांडला आहे. इरिगेशन, ग्रामविकास खाते सांभाळले आहे. जयंत पाटील हे योग्य वेळी योग्य निर्णय या टॅगलाइन खाली महायुतीत येणार असतील, तर नक्कीच आम्हाला अभिमान वाटेल. चांगले वाटेल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. यावेळी झालेल्या काही सूचक सूतोवाचावरून राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.