अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा इस्लामपूर व राजारामबापू पाटील ज्ञान प्रबोधिनी यांच्यावतीने माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१४ ते १६ फेब्रुवारी अखेर इस्लामपूर येथे २४ वी जयंत करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांचे आयोजन केल्याची माहिती राजारामबापू पाटील ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, इस्लामपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. सूरज चौगुले यांनी दिली. गेली २३ वर्षे नाट्य परिषदेच्या वतीने इस्लामपूरात एकांकिका स्पर्धांचे आयोजन केले जाते. लोकनेते राजारामबापू पाटील नाट्यगृहात स्पर्धा होणार असून इस्लामपूर व परिसरातील नाट्य रसिकांना या तीन दिवसांमध्ये विविध विषयांवरील हौशी कलाकारांनी तयार केलेल्या एकांकिका मोफत पाहण्याची सुवर्णसंधी नाट्य परिषदेच्या माध्यमातून मिळणार आहे.
स्पर्धेत दररोज ८ एकांकिका सादर होतील. स्पर्धेत प्रथम २५ हजार व जयंत करंडक, द्वितीय २० हजार व चषक, तृतीय- १५ हजार व चषक देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ ५ एकांकिकांना प्रत्येकी ५ हजार देण्यात आहेत. वैयक्तिक येणार पारितोषिकांसाठी २० हजारांची वैयक्तिक पारितोषिके आहेत. स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता असून पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ९ वाजता होणार आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नाट्य परिषदेचे प्रा. प्रकाश जाधव, रज्जाक मुल्ला, प्रा. अक्षय कुलकर्णी, डॉ. संदीप पाटील, उदयसिंह पाटील, राजाभाऊ कदम, रोजा किणीकर, अलका शहा, योगिता माळी, डॉ. नीलम शहा, गंधार जाधव, अज्ञेय पाटील, गणेश पोतदार परिश्रम घेत आहेत.