राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १४ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता अतिग्रे फाटा येथे नात्यातील रनवॉक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे.विद्यार्थी आणि पालकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते माजी आमदार राजीव आवळे यांनी माहिती दिली. सध्या मोबाईलमुळे नात्यातील संवाद हरवत चालला आहे. तो पुन्हा वृद्धिंगत व्हावा यासाठी रनवॉक स्पर्धेचे आयोजन केले आहे.
जो विद्यार्थी आई-वडील किंवा पालकांसोबत स्पर्धेत सहभागी होईल, त्या कुटुंबाला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. ५ वी ते ७ वीसाठी रुकडी फाटा ते चोकाक, परत रुकडी फाटा अशी तीन किलोमीटर स्पर्धा असणार आहे. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रुकडी फाटा ते माले फाटा आणि परत रुकडी फाटा अशी पाच किलोमीटरची स्पर्धा असणार आहे. दोन्ही स्पर्धांमध्ये पालकही सहभागी होऊ शकतात. स्पर्धा विनामूल्य असून १४ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल. सहभागी स्पर्धकांच्या नाष्ट्याची व्यवस्था केली आहे.
स्पर्धकांना स्पर्धा मार्गावर हायड्रेशन सपोर्ट दिला जाणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांसह पालकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला हातकणंगले तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. राहुल आवळे, शारदा पाटील, संग्रामसिंह जाधव, ललित नवनाळे, सागर मोरे, शुभम शिंदे उपस्थित होते.