आष्ट्यात विकास कामांचा शुभारंभ….

आष्टा येथील रावळ प्लॉटमधील नगरपरिषदेच्या खुल्या जागेमध्येचहुउद्देशीय सभागृह व सुशोभीकरण करणे ४६ लाख ६१ हजार रक्कमेच्या कामाचा शुभारंभ स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपा युवा मोर्चा वाळवा तालुका अध्यक्ष प्रविण माने म्हणाले, निशिकांत भोसले पाटील यांच्या प्रयत्नातून हे काम मंजूर करण्यात आले आहे. तरी येत्या काळात या रावळ कॉलनी व परिसरातील सर्व भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध राहु. यावेळी डॉ. सतीश बापट, संदीप गायकवाड, उदय कवठेकर, दादासाहेब वाघमारे, अविनाश काळोखे, संजय सावंत, नरेंद्र घाटगे, रोहित यादव पाटील, जयवंत खोत, शितल चौगुले, सुरेंद्र मालगावे, दत्तात्रय कोळेकर, शोएब सनदे, पृथ्वीराज चव्हाण, विशाल थोटे, दीपक कोळी, अमोल चाळके, निलेश पाटील, शिवप्रसाद भोसले, प्रशांत मगदुम, सुरज वाघमारे, शुभम माळी, विनोद कोळी, महेश घस्ते, विक्रम लोखंडे, चिकु मोहिते, अमोल कराडे, सुजय चौगुले, विजय चौगुले, समीर पटवेगार व नागरिक उपस्थित होते. स्वागत विजय चौगुले यांनी केले. आभार दिलीप जगदाळे यांनी मानले.