आमदार जयंत पाटील यांचा आगामी विधानसभा निवडणुकीबाबतीत विश्वास!

आष्टा येथे विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधकाकडून दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला जाईल. सत्तेचा वापर करून आमिष दाखवले जाईल .परंतु ,वाढवा तालुक्यातील जनता ही सुज्ञ असून ती कोणत्या आमिषाला बळी पडणार नाही. मलाच पुन्हा विधानसभेत पाठवून जनतेची सेवा करण्याची संधी देईल, असा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला कारंदवाडी येथे आमदार जयंत पाटील यांच्या आमदार फंडातून झालेल्या विविध विकासकामाचे उद्घाटन विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात लोकार्पण प्रसंगी जयंत पाटील बोलत होते.