धक्कादायक! नाल्यात फेकून दिलं नवजात अर्भक, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

सोलापूरमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे सोलापूरमध्ये एका नवजात अर्भकाचे लचके तोडल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे सोलापूरमध्ये नेहमी वर्दळ असणाऱ्या रुपाभवानी परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकराने सोलापूरमध्ये खळबळ उडाली आहे.

सोलापूरमधील ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. रुपभवानी मंदिर परिसरातील नाल्यात पुरुष जातीच्या अर्भकाला फेकून दिले होते. या अर्भकाचे लचके तोडले आहेत. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी परसली. बातमी पसरताच बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. या घटनेची पोलिसांनी दखल घेतली आहे. घटनास्थळी पोलिस पाहणी करत आहेत. दरम्यान, सदर प्रकारात अनैतिक संबंधातून किंवा अन्य कारणाने अर्भकाला टाकून दिले असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे. पोलिसांना मृत अर्भक शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.