पी.एम. ई-बस जानेवारीमध्ये इचलकरंजीत दाखल होणार आहेत. त्यामुळे बस स्थानकाच्या निर्मितीचे काम सोलगे मळ्यामध्ये वेगाने सुरू आहे. सिटी बससाठी आगार व्यवस्थापकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मदतीतून शहरामध्ये सिटी बस सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी इचलकरंजीला सुमारे वीस बस मंजूर झाल्या आहेत. जानेवारीत महापालिकेकडून या बस दाखल होणार आहेत.
बसस्थानकासाठी सोलगे मळ्यामध्ये जागा निश्चित केली आहे. या जागेवर बस स्थानक, चार्जिंग स्टेशन होणार आहे. बस स्थानकासभोवती कम्पाउंड बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. छत उभारणीसाठीही आवश्यक नियोजन करण्यात येत आहे.काम जरी वेगाने सुरू असले, तरी हे काम पूर्णत्वास जाण्यास किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. असे असले, तरी पुढील महिन्यात बस दाखल होणार असल्याने शहरातील प्रवाशांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.