इचलकरंजी महानगरपालिकेचे पंचवटी चित्रमंदिर परिसरातील नागरिकांना पाण्याचा पुरवठा व्यवस्थित हाोण्यासाठी येथे सुमारे १५ लाख लीटर क्षमता असलेले जलकुंभ तत्कालीन पालिकेने बांधले होते. जलकुंभामुळे परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या मार्गी लागली, मात्र येथे सुरक्षारक्षक नसल्याने व टाकीत पाणी जलशुध्दीकरण केंद्रामधून भरण्यात येत असल्याने टाकी भरून शुद्ध पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे
. ते टाकीच्या खालीच साचल्याने रोगराई वाढण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण होत आहे. शहरात पाण्यासाठी नागरिक वणवण भटकत असताना येथे अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे.पंचवटी चित्रमंदिर परिसरामध्ये उभारलेल्या जलकुंभास सुरक्षारक्षक नसल्याने ते असुरक्षित बनले आहे. टाकीमध्ये पाणी भरून वाया जाते. परिणामी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. पाणी ही सतत टाकीखाली साचलेले असते. त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत परिसरातील नागरिकांकडून वारंवार तक्रार करूनही उपाययोजना होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
.