अनेक भागात वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच भागात काटेरी झुडुपांमुळे देखील वाहनचालक तसेच पादचारी याना त्रास होतो. सांगोला पंढरपूर हा महामार्ग सिमेंट काँक्रिटीकरण झाल्यामुळे या रस्त्यावरून मोठी वाहनांची रेलचेल सुरू आहे. दरम्यान या रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडांच्या फांद्या व काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजुने वाहन चालविणे धोकेदायक ठरत आहे. या रस्त्याने अवजड वाहनांसह मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरु असते.
रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडांच्या फांद्या तसेच काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजुने वाहन चालविणे धोकेदायक ठरत आहे. वाहनांची मोठी वर्दळ असल्याने काटेरी झुडपामुळे छोट मोठ्या अपघात घडत आहेत. याबाबत संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून काटेरी झुडपे काढून घ्यावीत अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष अरुण बिले यांनी केली आहे. रात्रीच्या वेळेस दुचाकीवरून प्रवास करतांना अनेक दुचाकीस्वारांच्या चेहऱ्यांना या काटेरी फांद्यांचे फटके बसत आहे. मात्र संबंधित विभागाचे या प्रकाराकडे सर्रासपणे दुर्लक्ष करीत आहे.
वाहनधारक व शहरातील नागरिक तक्रार करत असताना देखील प्रशासन याकडे गांभीर्याने घेणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित करीत, अद्यापपर्यंत काटेरी झुडपे काढण्यात आली नसल्याने वाहनचालक त्रस्त असुन सांगोला नगरपालिका प्रशासन व महामार्ग प्रशासन यांनी त्वरीत लक्ष द्यावे, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष अरुण बिले यांनी केली आहे.