जयंत पाटील यांचा सरकारला खोचक सवाल….

राज्यातील वीज दर देशात सर्वाधिक असून यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी यावरून महायुतीला घेरलं आहे.यावेळी जयंत पाटील यांनी इतर राज्यांचे वीज दरांची माहिती देताना, मोफत वीज देऊ म्हणणारे आता बहुमताने सत्तेत बसले आहेत. आतातरी राज्यातील जनतेला कमी दरात वीज मिळणार का? राज्यातील अवाढव्य वीजदर कमी करण्यात सरकारला कोणतीच अडचण नसावी, असाही टोला लगावला आहे.

राज्यात वीज दरात सतत वाढ होत असून विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान वीज दरात कपात करू असे आश्वास या महायुतीने दिले होते. यावरून जयंत पाटील यांनी महायुतीवर निशाना साधला आहे. जयंत पाटील यांनी याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट करत महायुती टोला लगावला आहे.