कबनूर येथील झेंडा चौकात शिवस्मारक उभारण्याची आम. राहुल आवाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि सर्वांच्याच हाती निकाल देखील आला. काहीच दिवसांपूर्वी आमदारांनी आमदारकीची गोपनीयतेची शपथ देखील घेतली. हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथील ग्रामपंचायतसमोर झेंडा चौकात स्मारक होण्यासाठी पाठपुरावा करून मागील गावसभेत ठराव संमत करून घेण्यात आला आहे. आपण स्वतः या शिवकार्यात लक्ष घालून कागदोपत्री शासकीय स्तरावरील मंजुरी मिळवून कबनूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारण्याचे कार्य तुमच्याकडून पूर्णत्वास येईल, असा कबनूर शहरातील असंख्य शिवप्रेमींना विश्वास आहे, तरी आपण शिवकार्य लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे असे निवेद म्हटले आहे. शिवप्रेमीच्या शिष्टमंडळाने आमदार राहुल आवाडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. कबनूरमधील ग्रामपंचायत कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारावे. अशी मागणी शिवप्रेमीकडून आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.