अलीकडच्या या काळामध्ये भटक्या मोकाट कुत्र्यांचा वावर हा सर्रास सगळीकडे पाहायला मिळतो. जागोजागी भटकी कुत्री आपला कळप घेऊन बसलेले असतात त्यामुळे मग अनेक अपघातांना देखील सामोरे जावे लागते.
अशीच मोकाट कुत्र्यांची समस्या सांगोला शहरात पहायला मिळत आहे. सांगोला शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा प्रश्न खूपच गंभीर बनत चाललेला आहे. या मोकाट कुत्रांमध्ये खूपच वाढ सांगोला शहरात झालेली आहे.
अनेक भटकी मोकाट कुत्री ही जागोजागी रस्त्याच्या मध्यभागी पाहायला मिळत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या मोकाट कुत्र्यांमध्ये भटकी तसेच पाळीव कुत्री यांचा समावेश आहे. ही भटकी मोकाट कुत्रे अनेक नागरिकांचा चावा देखील घेत आहेत. यामुळेच खूपच चिंतेचे वातावरण सांगोला शहरात बनलेले आहे.तसेच अनेक अपघात देखील या भटक्या मोकाट कुत्र्यामुळे होत आहेत.
वाहन चालवताना अगदी खूपच काळजीपूर्वक चालवावे लागत आहे. कारण मग अपघात देखील या भटक्या कुत्र्यामुळे होत आहेत. ही भटकी मोकाट कुत्रे जास्त मटण चिकनच्या स्टॉलपाशी आपले घर करून बसलेले असतात. तसेच अनेक कचऱ्यांच्या ठिकाणी देखील ही भटकी कुत्रे पाहायला मिळत आहेत. अनेक नागरिकांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे.
या मोकाट कुत्र्यांच्या चावण्यामुळे रेबीज सारखे आजार देखील होण्याची शक्यता आहे. कुत्र्यांवरती नियंत्रण ठेवण्याचे काम नगरपालिका प्रशासन करते. पण नगरपालिका प्रशासनाच्या वतीने केलेल्या प्रयत्नाला आवश्यक ते यश आलेलं नाही. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने व्यावसायिकांना योग्य त्या सूचना देऊन तसेच मोकाट कुत्री पकडावीत आणि निर्विझिक्रन करावे मागणी नागरिकांकडून केली जात आहे.