सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी पंढरपुरची आमसभा गाजवली

पंढरपुर येथे गुरुवारी आमसभा संपन्न झाली. पंढरपुर तालुका चार विधानसभा मतदार संघात विभागला गेला असल्याने व ग्रामसभेला आमदार भाई बाबासाहेब देशमुख, मा. आमदार अभिजीत पाटील, मा. आमदार समाधान आवताडे, मा. आमदार राजु खरे आसे चार आमदार उपस्थित होते. नेहमी प्रमाणे या वेळेस सुध्दा ही ग्रामसभा वादळी ठरली. रात्री उशीरा अकरा वाजेपर्यंत या ग्रामसभेचे कामकाज चालले होते. सांगोला विधानसभा मतदार संपाचे लोकप्रिय आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी या ग्रामसभेत अनेक विषयांना वाचा फोडली. विशेषता शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरती आमदार बाबासाहेब देशमुख हे आक्रमक झाले.

निरा उजव कालव्याचे उन्हाळी आवर्तन ताबडतोब सुरु करून सोनके तलाव भरून घेण्याची मागणी केली. तसेच उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन बंधारे, ओढे-नाले तातडीने भरून घेण्याची मागणी केली. ज्यांना रेशन कार्ड नाही तर काहीना रेशन कार्ड आसुन धान्य गिळत नाही याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांची माहीती गोळा करून आसे लोक रेशनच्या धान्य मिळण्यापासून अलिप्त राहणारा नाहीत याची काळजी अधिकाऱ्यांनी घेतली पाहीजे. त्यासाठी लवकरात लवकर उपाय योजना कराव्यात. आमदार बाबासाहेब देशमुख यांनी विहरीवरील डिपी च्या बाबतीत सुध्दा योग्य ते नियोजन नसल्याचा गंभीर आरोप केला. आमदार बाबासाहेब देशमुख यांनी निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल सुद्धाअधिकाऱ्यांना धारेवर धरले.

पंढरपुर हे एक सुसज्ज शहर असून पंढरपुर हे तिर्थक्षेत्र सुध्दा आहे. ईथे सुसज्ज असे मेडिकल कॉलेज असले पाहीजे त्यासाठी सर्वांनी मिळुन पक्षीय राजकारण बाजुला ठेऊन प्रयत्न करुया अर्थ आवाहन आमदार बाबासाहेब देशमुख यानी केले. सदर आमसभेमध्ये तहसीलदार साहेब, डि.वाय. एस.पी साहेब बिडीओ साहेब पाटबंधारे विभागाचे अधिकारी, सार्वजनीक बांधकाम अधिकारी, कृषी विभागाचे विभागाचे अधिकारी वसेय पंढरपूर तालुक्यातील नेते पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.