महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार याची चिंता महिलांना होती. मात्र, आता ही चिंता दूर होणार असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यानेच डिसेंबर महिण्याचे पैसे कधी मिळणार यावर भाष्य केले आहे.भाजप नेते, आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘मी अजितदादांशी चर्चा केली आहे. त्यामुळे पुढील दोन तीन दिवसांत महिलांना हफ्ता देऊ असे ते म्हणाले आहेत. ते या सर्व कामात व्यस्त असल्याने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मी आश्वसत करू इच्छतो की त्यांना पैसे पोहोचतील.’
लाडक्या बहिणींचा या वर्षाचा शेवट गोड होईल, असा दावा देखील मुनगंटीवार यांनी केला आहे. दरम्यान, लाडक्या बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याची चर्चा होती. या बदल्यामुळे तब्बल 40 लाखांपेक्षा अधिक महिलांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात आलेला नाही, असे आमदार आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.